Maharashtra247

पतीचा खुन करणारी वकील पत्नी आरोपी प्रियकरासह ताब्यात 

 

 

अहमदनगर (दि.३० ऑगस्ट):-नेवासा तालुक्यातील पाचेगांव येथे पतीचा खुन करणारी वकील पत्नीस प्रियकरासह ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

बातमीची हकीगत अशी की,दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी नेवासा तालुक्यातील पाचेगांव शिवारात शिवाजीराव पवार मेडीकल कॉलेजच्या जवळ शेतगट नंबर २०७ मध्ये एक अनोळखी इसमाचा कोणीतरी धारदार शस्त्राने गळा कापुन खुन झाल्याची घटना झाल्याने या घटनेबाबत पोलीस पाटील श्री.संजय लक्ष्मण वाकचौरे (रा.पुनतगांव,ता.नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.७७२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), २३८ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.श्री.दिनेश आहेर व नेवासा पोलीस ठाण्याचे पोनि.श्री.धनंजय जाधव यांना आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव,अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार संदीप दरंदले,अमृत आढाव,प्रमोद जाधव,रोहित येमुल, बाळासाहेब खेडकर,शरद बुधवंत,संतोष खैरे,फुरकान शेख,प्रशांत राठोड,अरुण मोरे, भाग्यश्री भिटे यांचे एक पथक व पोनि/धनंजय जाधव,नेवासा पोलीस स्टेशन यांनी त्यांचे कडील पोलीस अंमलदार राजु केदार,अरुण गांगुर्डे, आप्पा तांबे,नारायण डमाळे,अमोल कर्डीले,सुमीत करंजकर,गणेश जाधव,गणेश फाटक यांचे एक पथक तयार करुन सदर पथकांना सुचना व मार्गदर्शन करुन पथके रवाना केली होती.

सदर दोन्ही पथकांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देवुन गुन्हा ठिकाणची बारकाईने पाहणी केली. तसेच घटना ठिकाणचे आजुबाजुचे लोकांना मयताची माहिती देवुन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु सदर मयताची ओळख पटलेली नव्हती.त्यामुळे सदर मयत हा बाहेर जिल्ह्यातील असल्याची शक्यता असल्याने मयताचे फोटो महाराष्ट्रामधील सर्व पोलीस स्टेशनला,तसेच व्हॉटस्ऍ़प ग्रुपवर पाठविण्यात आलेले होते.दोन्ही पथकांनी गुन्हा घडले ठिकाण पासुन नेवासा,श्रीरामपुर जाणारे रोडवरील सलग ७ दिवस सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपींची माहिती काढत असतांना घटना ठिकाणचे आजुबाजुस रॅनॉल्ट ट्रिबर गाडी संशयीत रित्या फिरत असतांना मिळुन आली. सदर गाडीचे माहिती काढुन गाडी मालकाची माहिती काढली असता सदरची गाडी ही अंबादास भानुदास म्हस्के (रा.रमाबाई नगर,जुना जालना,मोतीबागजवळ, ता.जि.जालना) याचे नावावर असल्याची माहिती प्राप्त झाली.

सदर गाडी मालकाचा शोध घेत असतांना त्याचा फोन मागील १५ ते २० दिवसांपासुन बंद असल्याने त्याची पत्नी मिना अंबादास म्हस्के हिची माहिती काढली असता ती लोणी,ता. इंदापुर,जि.पुणे येथे भाडोत्री खोली घेवुन राहत असल्याची माहिती मिळाली.दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी लोणी,ता. इंदापुर,जि.पुणे येथे जावुन मिना म्हस्के हिचा शोध घेत असतांना ती एका इसमासह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे लहु शिवाजी डमरे वय 31 वर्षे,ढोकसळ,ता. बदनापुर,जि.जालना, मिना अंबादास म्हस्के वय 36 वर्षे,रा.रमाबाई नगर,जुना जालना, मोतीबागजवळ,ता.जि. जालना असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास विश्वासात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता लहु शिवाजी डमरे याने त्याचे मिना अंबादास म्हस्के हिचे सोबत प्रेमसंबध असुन तिचा मयत पती अंबादास भानुदास म्हस्के रा.रमाबाई नगर,जुना जालना,मोतीबागजवळ, ता.जि.जालना हा नेहमी तिस त्रास देवुन चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यास पुणे या ठिकाणी कामाकरीता जायचे आहे असे सांगुन त्यास रेनॉल्ट ट्रिबर गाडीमध्ये घेवुन येवुन रात्रीचे वेळी त्याचा गळा आवळुन तो खाली पडल्यानंतर त्याचा गळा कापला व तेथुन निघुन गेल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी नेवासा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग शेवगांव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page