अहमदनगर (दि.७ सप्टेंबर):-अहमदनगर मध्ये बायपास रोडवर कांदा मार्केटसमोर भररस्त्यात एका कांदा व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या हल्लेखोरांनी व्यापार्यावर तलवार व कोयत्याने वार करून त्यांच्या जवळील रोख रक्कम चोरून नेण्यात आली असून या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला आहे.
सकाळी ११ च्या सुमारास आडते व कांदा व्यापारी सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत होते. याच वेळी बायपास रोडवर काही तरुणांनी त्यांना तलवार कोयत्याचा धाक दाखवून वार करुन हल्ला चढवला.तसेच त्यांच्या कडील रोख रक्कम लुटून पोबारा केला.या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सय्यद यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
