अहमदनगर (दि.८ सप्टेंबर):-नगर शहरातील सारसनगर भागात एकाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
सदर आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली.भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोहेकॉ/संदीप घोडके,पोहेकॉ/दीपक शिंदे,पोहेकॉ/रवींद्र टकले यांच्या पथकाने आरोपीला मोठया शीताफिने तपास करत अवघ्या दोन तासात अटक केली.
खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून भिंगार कॅम्प पोलीस अधिक तपास करत आहेत.
