वणी प्रतिनिधी:-महीला सक्षमीकरणासाठी महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी तसेच महिला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या निशा गायकवाड यांनी दि.११ सप्टेंबर २०२४ रोजी शिलाई मशीनचे वाटप करायचे ठरविले होते.
परंतु काही विघ्नसंतोषी माणसांनी या चांगल्या होणाऱ्या कामांमध्ये अडथळा आणला.व सौ.निशा गायकवाड यांची नाहक काही कारण नसताना बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू केले.परंतु निशा गायकवाड म्हणाल्या की मी अशा बदनामीला घाबरत नसून ११ सप्टेंबर रोजी चा हा कार्यक्रम रद्द करून पुन्हा हा कार्यक्रम २४ नोव्हेंबर २०२४ रोजी महिलांच्या साक्षीने मोठा करणार आहे.व यातून विरोधकांची यादी ही वगळण्यात आली असल्याचे सौ. गायकवाड यांनी सांगितले आहे.
तरी सर्व महिलांनी २४ नोव्हेंबर २०२४ रोजी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ.निशा गायकवाड यांनी केले आहे.
