अहमदनगर (दि.१० सप्टेंबर):-नगर शहर व परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.

त्याच्या कडून एकूण ४ लाख २० हजारांच्या ८ मोटर सायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.बातमीची हकीकत अशी की,घटनेतील फिर्यादी सुयश गोविंद नगरे हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले असता त्यांची होंडा कंपनीची मोटर सायकल चोरी झाली याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तोफखाना पोलीस आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,एक इसम सोनानगर चौक येथे चोरी केलेल्या गाड्यांची विक्री करण्यासाठी येणार आहे.तात्काळ पोनि/कोकरे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यास सांगितले.पोलीस अंमलदार सोनानगर चौकात सापळा रचून थांबलेले असताना एक इसम हिरो होंडा शाइन गाडीवर येऊन थांबला व इकडे तिकडे पाहू लागला पोलिसांना त्याचा संशय आला पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले व त्याचे नाव विचारले त्याने त्याचे नाव किशोर जयसिंग पठारे असे सांगितले.
त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोरून होंडा शाईन गाडी चोरली आहे अशी कबुली दिली व शहरातील विविध ठिकाणावरून चोरलेल्या ८ मोटरसायकली वडगाव गुप्ता येथे लपवून ठेवलेल्या आहे असे सांगितले.
आरोपीकडून त्या मोटरसायकली ही पोलीसांनी तात्काळ जप्त केल्या.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार पोउपनि/शैलेश पाटील,सफो/तन्वीर शेख,पोहे/सुनील शिरसाठ,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,दिनेश मोरे,भानुदास खेडकर,अहमद इनामदार,सुधीर खाडे,सुरज वाबळे,वसीम पठाण,सुमित गवळी,सतीश त्रिभुवन,बाळासाहेब भापसे, दत्तात्रय कोतकर,संदीप गिरे,राहुल मस्के,चेतन मोहिते,शफी शेख,तांत्रिक विश्लेषण विभाग नगर दक्षिण येथी पोकॉ/नितीन शिंदे यांनी केली आहे.
