अहमदनगर (दि.१४ प्रतिनिधी:-स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हिंदी दिवसानिमित्त ‘श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे’ यांच्या स्मृती प्रीत्यर्थ हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे हे प्रथम वर्ष होते,या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच संपन्न झाले.प्रथम पारितोषिक १००० रू./-व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिक ७५०रु./- व प्रमाणपत्र,त्रितीय पारितोषिक रुपये ५०० रू./-व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ पारितोषिक ३०० रु./-व प्रमाणपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते.सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या तथा हिंदी शिक्षिका सौ.कांचन पापडेजा या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.स्नेहालय संस्थेच्या विश्वस्त मुग्धा शुक्रे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.तसेच शाळेचे मानद संचालक श्री.राजेंद्र शुक्रे,मुख्याध्यापिका वीणा मुंगी,प्रशासकीय अधिकारी राजू पांढरे इ.उपस्थित होते.
पाचवी ते सातवी तसेच आठवी ते दहावी अशी दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.‘मोबाईल कि दुनिया फायदे और दुष्परिणाम’ आणि ‘महिला सुरक्षा चुनौतीयाँ और समाधान’ असे दोन विषय देण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये शहरातील तसेच जिल्ह्यातील एकूण जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी उस्त्फुर्त सहभाग घेतला.यामध्ये मोबाईल कि दुनिया फायदे और दुष्परिणाम या निबंधासाठी प्रथम पारितोषिक टाकळी खातगाव येथील हनुमान विद्यालयाची विद्यार्थिनी कल्याणी दत्तात्रय कांडके,द्वितीय क्रमांक कर्नल परब स्कूलचा ह्र्दय रोहन खंडेलवाल,तृतीय क्रमांक-ब्ल्यू डाइमंड अकॅडमीची ऐश्वर्या रमेश गीते तर उत्तेजनार्थ मलाला बालभवनची जोया फिरोज सय्यद यांना देण्यात आला.महिला सुरक्षा चुनौतीयाँ और समाधान या निबंधासाठी प्रथम क्रमांक सनफार्म इंग्लिश मेडियम स्कूलचा प्रणव नंदकुमार अजबे,द्वितीय क्रमांक सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलचा शौनक हृषीकेश कुलकर्णी,तृतीय क्रमांक श्री.सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडीयम स्कूलची स्वस्तिका हेमंत नागपुरे,तर उत्तेजनार्थ स्नेहालय इंग्लिश मिडीयम स्कूलच्या साई तुपे यांना देण्यात आला.
कंचनजी पापडेजा यांनी विविध हिंदी लेखकांचा उल्लेख करून त्यांच्या साहित्यांवर उहापोह केला.संत कबीर के दोहेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्व सांगितले.भाषेवर प्रेम केल्यास भाषा अवगत होण्यास मदत होते,हिंदी मधील साहित्य वाचण्यास तसेच अभ्यास करण्यास मुग्धा शुक्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी शिक्षिका यास्मिन सय्यद यांनी केले तर आभार शिक्षिका ज्योती चव्हाण यांनी मानले.या कार्याक्रमाचे सुत्रासंचलन शबाना शेख यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
