पैशांसाठी खोटे लग्न करणाऱ्या बनावट नवरीस तिच्या साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश
अहमदनगर (दि.१८ प्रतिनिधी):-पैशांसाठी खोटे लग्न करुन फसवणुक करणाऱ्या सराईत आरोपींना श्रीगोंदा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. 0838/2024 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 318(4), 303(2), 3(5) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे नवरीचा बनावट रोल करणारी एक महीला, नवरीच्या बहिणीचा रोल करणारी एक महीला,नवरीच्या दाजीचा रोल करणारा इसम नामे विठठल किसन पवार रा. महालक्ष्मी खेडा,पो. सावखेडा जि. संभाजीनगर,नवरीच्या काकाचा रोल करणारा इसम नामे ज्ञानेश्वर लक्ष्मण दाभाडे रा. धुपखेडा ता.पैठण.जि. संभाजीनगर यांचा शोध घेत असताना तांत्रिक तपास व गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाल्याने सदर आरोपींना संभाजीनगर येथील वेगवेगळया ठिकाणाहून सापळा रचुन अटक केले असून त्यांच्या इतर साथीदारांचा सहभाग निष्पन्न करुन त्यांचा शोध सुरु आहे.
तसेच त्यांचे कडून 5,00,000/-रुपये किंमतीची मारुती सुझुकी इको व्हॅन जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई दि.16 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोना/गोकुळ इंगावले हे करीत आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग श्री. विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक श्री. किरण शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक/संपत कन्हेरे यांचे पथकामधील पोना/गोकुळ इंगावले, पोकॉ/संदिप शिरसाठ, पोकॉ/आनंद मैड, पोकॉ/संदिप राऊत, मपोकॉ/प्रमिला उबाळे,दक्षिण मोबाईल सेल नेमणुकीचे पोकॉ/ राहुल गुंडु व पोकॉ/नितीन शिंदे यांनी केली आहे.