उपनगरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाच्या गोण्यांखाली लपवुन ठेवलेले घातक शस्त्र जप्त..!तोफखाना पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली अनुचीत घटना..
अहमदनगर (दि.१८ प्रतिनिधी):-गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाच्या गोण्यांखाली लपवुन ठेवलेले घातक शस्त्र तोफखाना पोलिसांनी जप्त केली आहे.यावरून तोफखाना पोलिसांचा मिरवणुकीतील सतर्कपणा समोर येतोय यामुळे येथील अनुचित घटना टळली आहे.
दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदनगर शहर व उपनगरामधे मोठया उत्साहात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आलेल्या होत्या.त्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात देखील आलेला होता.तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे हे स्वत:तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने शहरातील तसेच तोफखाना पोलीस स्टेशन हद्द असलेल्या उपनगर भागातील मिरवणुकीतील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन होते तसेच चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता.
तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील उपनगर भागात असलेल्या काही गणेश मंडळांच्या आपसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलेले असतानाच सायंकाळच्या सुमारास तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,उपनगराचाराजा गणेश मित्र मंडळाचे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेश मुर्तीच्या ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये गुलालाचे गोण्याचे खालील तलवार व काही घातक शस्त्रे काहीतरी घातपात करण्याचे उद्देशाने गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी लपवुन ठेवलेली आहे.
सदर बातमी मिळताच पोलीस निरीक्षक स्वत: तात्काळ सोनानगर चौकात हजर होवुन तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह बातमी मिळाले प्रमाणे उपनगरराजा मित्र मंडळाचे गणेश मुर्ती ठेवलेल्या ट्रॉलीची पंचाचे समक्ष झडती घेतली असता ट्रॉलीमध्ये एक लोखंडी कोयता,तीन लोखंडी पाईप,एक कटावनी व एक लोखंडी पाईपला सायकलचा गियर लावुन केलेले घातक शस्त्रासह एक बेस बॉल खेळण्याचा दांडा एका सफेद गोणीमध्ये लपवुन ठेवले असल्याचे मिळून आल्याने सदरचे हत्यारे पोलीस स्टाफने जप्त करण्यात आले.
पो.हे.कॉ.रणजित अजिनाथ बारगजे यांनी उपनगरचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोस्टे गु र नं 1017 / 2024 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ/दत्तात्रय जपे हे करत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ श्री आनंद कोकरे, सपोनि.श्री/उज्वलसींह राजपुत,स.पो.नि.श्री/ हेमंत थोरात, नेम.स्था.गु.शा., पोउपनिरी.श्री.शैलेश पाटील,स.फौ.तनविर शेख,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाट, दिनेश मोरे,भानुदास खेडकर,अहमद इनामदार,रंजित बारगजे, सुनिल आंधळे,प्रदिप बडे,सुरज वाबळे, पो.हे.कॉ.बेरड, स्था.गु.शा.,पो.ना/वसीम पठाण,पो.कॉ.सुमीत गवळी,शिरीष तरटे, सतिष त्रिभुवन,दत्तात्रय कोतकर,बाळासाहेब भापसे,सतीष भवर, राहुल म्हस्के,शफी शेख, संदिप गिऱ्हे यांचे पथकाने केली आहे.