अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर नावाने ओळखला जाणार;नागरिकांना नावातील बदलाची नोंद घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अहिल्यानगर (दि.९ ऑक्टो):-सामान्य प्रशासन विभागाच्या ४ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेनुसार अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर करण्यात आल्याने महसूल व वन विभागाने ८ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील महसूल क्षेत्रांच्या नावात बदल केला आहे.
आता अहमदनगर जिल्हा,तालुका, उपविभाग आणि गावाला अहिल्यानगर नाव देण्यात आले आहे.नागरिकांनी नावातील या बदलाची नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
नावातील बदल प्रशासनातील कामकाजात तात्काळ करण्यात येणार आहे.प्रशासनाच्या सर्व दस्तऐवजामध्ये अहिल्यानगर या नवीन नावाचा उपयोग करण्यात येईल,असेही जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.