Maharashtra247

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यावर असताना योग्य मानवी सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या;आम आदमी पक्षाच्या पुणे शहर शिक्षक आघाडीच्या शहर अध्यक्षा शितल कांडेलकर यांची निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 

पुणे (दि.२९ प्रतिनिधी):-शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यावर असताना योग्य मानवीय सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी पुणे शहर आम आदमी पक्षाच्या शिक्षक आघाडी अध्यक्षा शितल कांडेलकर यांनी केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य व लोकसेवक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पुणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा २०२४ या लोकशाहीचा सोहळा यशस्वी होण्यासाठी आपण सर्व अहोरात्र परिश्रम घेत आहात. त्यासाठी सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा परंतु निवडणूक कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांना दुर्गम अवघड क्षेत्रात कर्तव्य पार पाडावे लागते.अशा अवघड स्थळी पोहोचताना खूप कसरत करावी लागते.प्रवासात पिण्या योग्य पाण्याचा अभाव,सहज सुलभ रस्ते नसणे,जंगलातील हिंस्र प्राणी इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते.तसेच इच्छित स्थळी पोहचल्या नंतर देखील प्रत्यक्ष मतदान केंद्रावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

उदा.पिण्याचे पाणी,प्रसाधन आणि आंघोळीची सुविधा,बूथ परिसरातील घाणीचे साम्राज्य,डास,यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो.तरी आपले राष्ट्रीय कर्तव्य जबाबदारीने पार पाडणाऱ्या आपल्या मनुष्य बळाचा वापर अधिक सक्षमपणे होण्यासाठी काही माफक परंतु आवश्यक सोई सुविधा देण्या बाबतीत आपल्या स्तरावरून आपल्या अधिनस्थ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्यास मतदान कर्तव्य केवळ औपचारिकता न राहता लोकशाहीचा आनंदी सोहळा ठरेल. 

 

You cannot copy content of this page