राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
अहिल्यानगर (दि.३० प्रतिनिधी):-विधानसभा २०२४ आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक क्र.१ अहिल्यानगर यांची नगर-पाथर्डी रोडलगत भिंगार ता.जि. अहिल्यानगर येथे अवैध मद्य वाहतूकीवर धडक कारवाई करून एकूण २० लाख ६३,८८०/-रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.श्री.विजय सूर्यवंशी,सहआयुक्त.श्री.प्रसाद सुर्वे,विभागीय उपायुक्त पुणे श्री.सागर धोमकर,जिल्हाधिकारी अहिल्यानगर श्री.सिद्धाराम सालीमठ,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर श्री.प्रमोद सोनोने,श्री.प्रविणकुमार तेली उपअधीक्षक यांच्या मार्गदशनाखाली विधानसभा निवडणुक २०२४ च्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१ अहिल्यानगर यांना नगर-पाथर्डी रोडवर चांदबीबी महालाजवळ भिंगार परिसरात एक चारचाकी महिंद्रा कंपनीचा जेनीओ पिकअप माल वाहतूक प्रादेशिक परिवहन क्र. MH १७ AG ६६५३ या वाहनातून अवेधरीत्या दारू वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी समजली.
त्या अनुषंगाने पथकाने सापळा लाऊन थांबले असता सदर संशयीत वाहन वेगाने येताना दिसले त्याचा पाठलाग करून थांबविले असता सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये देशी विदेशी मद्याचे विविध ब्रँड विविध क्षमतेचे एकूण१९० बॉक्स असा एकूण वाहनासह २०,६३८८०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी मोहन नामदेव बडदे (वय ४५ वर्ष रा.खामगाव काझी गल्ली,जोहरापूर ता.शेवगाव जि.अहिल्यानगर) व इतर अज्ञात इसम यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ अहिल्यानगर यांचे कार्यालयाकडे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्री.सुरज कुसळे निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १,श्री.कुमार ढायरे,निरीक्षक अ-विभाग,श्री.बाबुराय घुगे, निरीक्षक,ब-विभाग,श्री.अरुण खाडे दुय्यम निरीक्षक,श्री.आनंद जावळे दुय्यम निरीक्षक,श्री.गहिनीनाथ नागरगोजे दुय्यम निरीक्षक,विनोद रानमाळकर स.दुनि.. जवान,सर्वश्री.सुरज पवार,दिनेश खेरे,खाडे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री.सुरज कुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक श्री.आनंद जावळे हे करीत आहेत.
तरी जनतेस आवाहन करण्यात येते कि,अवैध मद्य निर्मिती,वाहतुक व विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९ व व्हाट्सअप क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.