Maharashtra247

अवैधरित्या गावठी पिस्टल जवळ बाळगणारा ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

अहिल्यानगर (दि.३० प्रतिनिधी):-श्रीरामपूर शहरामध्ये गावठी कट्टा बाळगणारा इसमास स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.नमुद आदेशान्वये स्थागुशा पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्राबाबत माहिती घेताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,एक इसम बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगत असून सध्या तो दत्तनगर, श्रीरामपूर जि.अहिल्यानगर येथे असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाचे पोलीस अंमलदार मनोज गोसावी,ज्ञानेश्वर शिंदे,फुरकान शेख,सोमनाथ झांबरे,प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड अशांचे पथक तयार करून संशयीताची माहिती घेवुन तो मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

तपास पथकाने सुतगिरणी फाटा,रेल्वे फाटकजवळ,दत्तनगर, श्रीरामपूर येथे संशयीत इसमाचा शोध घेऊन, त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव इम्तीयाज उर्फ बबलू अजीज शहा, (वय 32,रा.काझीबाबा रोड, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 30,000/- रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल व 1,000/- रुपये किंमतीचे 2 काडतुस असा एकुण 31,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी नामे इम्तीयाज उर्फ बबलू अजीज शहा याचे विरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 1038/2024 आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

You cannot copy content of this page