उबाठाच्या शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार
नगर प्रतिनिधी:-महिलांसाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिना सुरू केला आहे.
महिलांना न्याय मिळावा, संरक्षण मिळावे, हक्काचा रोजगार मेळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पूर्वीपासून नगर शहरात कार्यरत आहे.महिलांना संरक्षण देण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी पक्ष नगर शहरात कार्यरत आहे.संघटनेच्या माध्यमातून महिलांचे कार्य कौतुकास्पद आहे.समाजात अनेक अडचणी सोडवण्यासाठी महिला कार्य करीत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून महिलांना समाजासाठी काम करण्यासाठी संधी मिळणार आहे.असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी गटात प्रवेश केल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख आशाताई निंबाळकर,शहर प्रमुख अरुणाताई गोयल,उपशहरप्रमुख मुक्ताताई मेटे,मंगलाताई गुंदेचा, राधा सोनग्रा,ज्योती गोयल, सुजाता कदम,श्रुती शिंदे, आशाताई शिंदे,सुषमा पडोळे,लता पठारे,संगीता ससे,प्रमिला गोयल आदी उपस्थित होते.