Maharashtra247

प्रत्येक मतदार स्वतःची निवडणूक समजून प्रचारात सहभागी आ.संग्राम जगताप;मार्केटयार्ड मधील प्रचारफेरीस व्यापारी वर्गाचा मोठा प्रतिसाद

 

अहिल्यानगर (दि.३० प्रतिनिधी):-विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यापासून नगर शहरात प्रचार सुरु केला आहे.

प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत मी पोहचत आहे.सर्व भागांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ही निवडणूक नगरकरांची निवडणूक आहे,त्यामुळे प्रत्येक मतदार स्वतःची निवडणूक समजून झोकून देवून प्रचारात सहभागी होत आहे.मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करत आहे.नगर शहराला विकासाची नवी दिशा देणारी महत्वाची ही निवडणुकी असल्याने सर्वानी आपला मतदानाचा अधिकार बजावावा,असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी केले.

विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी शहरातील मार्केटयार्ड बाजारपेठेत प्रचार फेरी काढून व्यापारी,दुकानदार,कर्मचारी,हमाल व नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मार्केटयार्ड मधील मारुती मंदिरात ज्येष्ठ व्यापारी शांतीलाल गुगळे, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र बोथरा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा अडते बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचारफेरीस शुभारंभ झाला. यावेळी उद्योजक राम मेंघानी, मिरची व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल मणियार, राजू शेटीया, हलाम पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले,माजी उपमहापौर गणेश भोसले संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, सुमतीलाल कोठारी आदींसह मोठ्या संख्यने व्यापारी,बाजारपेठेतील कर्मचारी व हमाल उपस्थित होते.मार्केटयार्ड मधील विविध व्यापारी असोशिएशनने आ.संग्राम जगताप यांना पाठींबा दिला आहे. शहरातील सर्व बाजार पेठ्यांच्या समस्या माजी आमदार अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांनी सोडवल्या तर आहेतच शिवाय मोठे संरक्षण जगताप परिवाराचे व्यापाऱ्यांना आहे.त्यामुळे त्यांना भरगोस मतांनी विजयी करण्याचे प्रत्येक व्यापाऱ्यांचे कर्त्यव्य जबाबदारी आहे.असे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले.

माजी जिप.सदस्य सचिन जगताप म्हणाले

मार्केटयार्ड मधील व्यापाऱ्यांशी जगताप परिवाराचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सर्व व्यापारीवार्गांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत.या प्रचार फेरीला सर्वांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.या प्रचार फेरीत कडबा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पवार,विजय मनोज,अमोल पोखरना, ललित गुगळे,आदेश चंगेडिया, दीपक बोथरा, योगेश चंगेडिया, किशोर श्रीश्रीमाळ, शशी घीगे, धनेश कोठारी, रोहन खिलारी, प्रशांत निमसे, संजय ताठे, प्रसाद बोरा, प्रदीप परदेशी, मयूर खेडके, अजय गांधी, दत्ता कासार, दीपक होले, नितीन शिंगवी आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी बाजारपेठेतील कर्मचारी व हमाल उपस्थित होते.

You cannot copy content of this page