बुरुडगाव येथील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून आ.संग्राम जगताप यांनी साधला संवाद;विरोधक काल्पनिक चित्र तयार करून सांगतात…मात्र ते काल्पनिक आहे तरी जनतेने जास्त सिरीयस घेऊ नये आ.जगताप
अहिल्यानगर (दि.१ प्रतिनिधी):-बुरुडगाव हे शहरालगतचे गाव असून गेल्या १० वर्षांमध्ये विकास कामातून कायापालट केला असून त्याला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे.
बुरुडगावचा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता हे गाव महापालिका हद्दी बाहेरील असल्यामुळे पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होत होती तरी देखील हा प्रश्न मार्गी लावला असून याच बरोबर सीना नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे नागरिकांचा कायमस्वरूपीचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.रस्ते लाईट,पाणी, ड्रेनेज आदी प्रश्न मार्गी लागून सामूहिक प्रयत्नतून बुरुडगावचा चेहरा मोहरा बदलला आहे.
शहराचे सर्वांगीण विकास कामे मार्गी लावले असल्यामुळे उपनगराच्या विस्तारीकरणाला गती प्राप्त झाली आहे केलेली विकास कामे मी सांगत आहे.शहरामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मतरुपी आशीर्वाद घेण्यासाठी फिरत असताना मी केलेल्या विकास कामाची पावती मिळत आहे समाजातील विविध स्तरातून मला पाठिंबा मिळत असून बुरुडगाव येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक कै.अरुण शिंदे यांच्या कुटुंबियांनी मला पाठिंबा दिला आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार संग्राम जगताप यांनी बुरुडगाव येथील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशाल पवार म्हणाले की,बुरुडगावातील विविध प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लागावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयापासून ते भिंगार नाल्यावरील तसेच सीना नदी वरील आरसीसी पुलाचे काम मार्गी लावले तसेच बुरुडगाव ते दौंड महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लावले असे ते म्हणाले.जालिंदर कुलट म्हणाले की गेल्या 50 वर्षां बुरुडगाव मध्ये कधीही विकासाचे काम झाले नव्हते मात्र आमदार संग्राम जगताप यांनी सर्वच प्रलंबित विकासाच्या योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत शासनाच्या माध्यमातून सुमारे 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला सीना नदीवरील आरसीसी पुलाचे काम मार्गी लागले असल्यामुळे गावाला गाव पण आले आहे. बुरुडगावचे नागरिक आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत असे ते म्हणाले.आता विधानसभेची निवडणूक सुरू झाली असून विरोधक काल्पनिक चित्र तयार करून सांगतात… मात्र ते काल्पनिक आहे तरी जनतेने जास्त सिरीयस घेऊ नये त्यांच्याकडून मनोरंजन करून घ्या आणि त्यांच्याकडे चित्रपट म्हणून पहावे असे मत संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.