अहिल्यानगर प्रतिनिधी:-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात दोन ठिकाणी छापे टाकून १)२१६ सिलबंद दारूच्या बाटल्या अंदाजे रु. १४,५०,४८०/- किंमतीचा मुददेमाल तसेच केवळ गोवा राज्यात विक्रिस असलेल्या ७५० मिली च्या ८४ सिलबंद बाटल्या एकूण ६५,५२०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन इसमाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई विभागीय उप आयुक्त श्री.सागर धोमकर,श्री.प्रमोद सोनोणे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर,श्री. प्रविणकुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर,यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग अहिल्यानगर श्री.बी. एस.घुगे,निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक म.रा.मुंबई श्री. रियाज खान,विजय कुमार थोरात,विभागीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे श्री.नरेंद्र थोरात व दुय्यम निरीक्षक सर्व श्री.रुपेश चव्हाण,राजेंद्र झोळ, अरुण खाडे,विजय वरठा,विराज माने व धीरज सस्ते,सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलिम शेख,रणजीत पारधे तसेच सर्वश्री योगेश मडके,श्री.अविनाश कांबळे,श्री.एन.डि. बहुरे, सौ.पुनम एन.आर, प्रताप कदम,सतिश पाँधे,रणजीत चव्हाण, शशीकांत भाट,अनिल थोरात,अमोल दळवी व राहुल तारळकर जवान नि वाहन चालक श्री. पांडुरंग देविदास गदादे यांनी केली असून,सदर गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक श्री.नरेंद्र थोरात,श्री.बी.एस.घुगे व रुपेश चव्हाण हे करीत आहेत.