संगमनेर प्रतिनिधी/(नितीनचंद्र भालेराव):-हिवरगाव पावसा ) जैन सोशल फेडरेशनच्या आनंदऋषीजी नेत्रालय, अहमदनर आणि राजयोग प्रतिष्ठान झोळे यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील हिवरगांव पावसा येथे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिर सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत पार पडले. यावेळी राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.शिवाजी खर्डे, संचालक मेजर गोविंद खर्डे,माजी भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,केशव दवंगे,कैलास दिवटे,श्री.बी.आर.नेहे,श्री.प्रदीप कढणे, श्री.बाळासाहेब गोसावी,श्री. दत्तात्रय गडाख,श्री.रघुनाथ भालेराव व हिवरगाव पावसाचे सरपंच श्री.सुभाष गडाख, उपसरपंच सौ.सुजाता दवंगे व भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक नारायण पावसे व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात एकुण १७४ नेत्ररुग्णांची मोफत नाव नोंदणी व डोळे तपासणी करण्यात आली.गरीब व गरजू रुग्णांना चष्मा वाटप करण्यात आले.हिवरगाव पावसा येथील गरजू ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतला.मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी सवलतीच्या दरात आनंदऋषीजी हॉस्पिटल अहमदनगर येथे रूग्णांना शस्रक्रियेसाठी नेण्यात येईल.राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने यापुर्वीही गरजु व कष्टकरी नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.यापुढेही वंचित व दुर्लक्षित समाज घटकांसाठी मदतीचा हात देण्यासाठी राजयोग प्रतिष्ठाण सदैव तत्पर असेल,असे राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड श्री. शिवाजीराव खर्डे यांनी सांगितले.
राजयोग प्रतिष्ठाण झोळे संगमनेर व आनंदऋषीजी नेत्रालय अहमदनगर तसेच ग्रामपंचायत हिवरगाव पावसा आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले.नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश पावसे, प्रकाश पावसे,अनिता दिवटे,किरण पावसे,सुरेश पावसे,माचीन्द्र पावसे,सचिन सस्कर,चंद्रशेखर गडाख,उत्तम जाधव,विलास पावसे,अशोक पावसे,अशोक गोफणे,बजरंग पावसे,रवींद्र पावसे,देवराम पावसे प्रयत्न केले तर ग्रामस्त शिबिरास मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.