अहिल्यानगर (दि.२० प्रतिनिधी):-वाहतुकी दरम्यान सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करणाऱ्या ड्रायव्हरला ताब्यात घेऊन 2 लाख 52,000/-रू. किं.मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी मोहमंद मुस्ताफा (रा.मेन रोड, श्रीवाचुर,पेरंबलोर, तामीळनाडू) यांनी दि.27/12/2024 रोजी परकोट मारिटिमा एजन्सी,तामीळनाडू या कंपनीच्या मार्फत कंटेनर क्रमांक पीबी-13-एडब्लू-5064 मधुन सीएट कंपनीचे टायर हलोल,गुजरात येथून होसूर तामीळनाडू येथे मागविलेले होते.कंटेनरवरील ड्रायव्हर याने सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली व रिकामा कंटेनर जातेगाव शिवार, ता.पारनेर येथे उभे केले.
याबाबत सुपा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 06/2025 बीएनएस कलम 316 (4) प्रमाणे विश्वासघाताचा गुन्हा दाखल आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना नमूद गुन्हयांचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव,पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,मनोहर गोसावी, फुरकान शेख,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड, सागर ससाणे,महादेव भांड अशांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. पथकाने गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषणाचे आधारे संशयीत आरोपी इरशाद निशार अहमद हा धुळे शहरामध्ये असल्याचे निष्पन्न केले.19 जानेवारी 2025 रोजी पथकाने धुळे शहरामध्ये संशयीत आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले.त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव इरशाद निशार अहमद,वय 55, रा.रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड,उत्तरप्रदेश असे असल्याचे सांगीतले.
ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने ट्रकमधुन सीएट कंपनीचे टायर तामीळनाडू येथे घेऊन जात असताना त्याचा साथीदार जावेद उर्फ जोसेफ शेख, रा.राणीगंज, जि.प्रतापगड,उत्तरप्रदेश (फरार) व 3) जावेदचा मित्र अन्सार पुर्ण नाव माहित नाही (फरार) अशांनी अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा, रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड,धुळे यास 82 टायर्स विकले.तसेच ट्रकमधील उर्वरीत टायर्स हे अहिल्यानगर जिल्हयामध्ये विक्री केले असून त्याबाबत मला सांगता येणार नसले बाबतची माहिती सांगीतली.पथकाने अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा,वय 24, रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड,धुळे याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.त्याचे कडे गुन्हयातील मुद्देमालबाबत विचारपूस केली असता रोडने जाणाऱ्या ट्रकला वेळोवेळी टायर विकले व उर्वरीत टायर्स हे अनिस हयात खान, रा.रमाबाई आंबेडकरनगर,गल्ली नं.9,देवपूर, धुळे याचे दुकानाच्या मोकळया जागेत ठेवलेबाबत माहिती सांगीतली.तपास पथकाने पंचासमक्ष अनिस हयात खान, वय 39,रा.रमाबाई आंबेडकरनगर,गल्ली नं.9,देवपूर, धुळे याने त्याचे दुकानासमोर ठेवलेले 2,52,000/- रूपये किंमतीचे सीएट कंपनीचे 12 टायर हजर केल्याने तपासकामी जप्त करण्यात आलेले आहेत.ताब्यातील आरोपी नामे इरशाद निशार अहमद, वय 55, रा.रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड,उत्तरप्रदेश व अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा,वय 24, रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड,धुळे अशांना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर श्री. संपतराव भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
