पाथर्डी (प्रतिनिधी):- एस टी कामगार सेनेच्या पाथर्डी आगारच्या तालुकाध्यक्ष कल्याण गर्जे,सचिवपदी अलीम पठाण,कार्यध्यक्षपदी संतोष आंधळे तर कोषाध्यक्ष पदी नारायण कंठाळे यांची एकमताने निवड करण्यात आली.पाथर्डी आगाराची कार्यकारणी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी अहिल्यानगर विभागीय सचिव श्री.नितीनजी येणे,विभागीय अध्यक्ष श्री.गणेशजी फाटक, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. राजेश घोरपडे,श्री. शिवनाथ आंधळे,नूर मोहम्मद पटेल यांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच पाथर्डी एसटी कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदी शिवसेनेचा निष्ठावंत वाघ युवा खंंबीर नेतृत्व श्री. संतोष आंधळे व ज्येष्ठ नेते नारायण मामा कंठाळे यांची खजिनदार पदी व श्री.भरत पालवे व आजिनाथ पालवे यांची उपाध्यक्षपदी श्री. राजू उबाळे,श्री.किरण दहिफळे यांची सहसचिवपदी निवड एकमताने करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्हा प्रमुख श्री. रामदास गोल्हार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री. विष्णुपंत पवार माजी पंचायत समिती सदस्य तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष,नंदकुमार डाळिंबकर,युवा सेनेचे शहर प्रमुख शिवव्याख्याते सचिन नागापुरे,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण, नवनाथ वाघ,नवनाथ उगलमूगले,आसाराम ससे,बबन शेळके,मंगेश राठोड यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.