अहिल्यानगर (दि.३१ जानेवारी):-सावेडी परिसरातील संदेश नगर वसंत टेकडी येथील द्वारकामाई साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाआरती महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन केलं जातं असते.गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या पुढाकारातून या ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात.नवीन वर्ष आणि मकर संक्रांति निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम आणि वीर माता वीर पत्नी आणि एकल महिलांचा गुणगौरव सोहळा संदेश नगरच्या द्वारकामाई साई मंदिरात पार पडला.
यावेळी महाआरती महाप्रसादाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका शितल जगताप,प्रियंका अक्षय कर्डिले तसेच वंदना फाटके यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला… यावेळी सर्व महिलांना हळदीकुंकू लावून वाण म्हणून महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले तसेच परिसरातील महिलांसाठी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या संकल्पनेतून इंडो आयरिस हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि महिलांसाठी मोफत गोळ्या आणि औषधांचे वाटप करण्यात आले… तसेच साई सेवा ब्लड बँक यांच्या वतीने देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील महिला आज मोठ्या संख्येने एकत्रित झाले आहेत.या कार्यक्रमामुळे विचारांची देवाणघेवाण होणार आहे.महिला घराबाहेर पडण्याची संधी त्यांना उपलब्ध होऊन अशा कार्यक्रमातून मानसिक शांतता आणि आधार मिळण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका शितल जगताप यांनी व्यक्त केले.आलेल्या मान्यवरांचे स्वागत नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी केले तर आभार आकाश त्र्यंबके यांनी मानले.यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,नगरसेवक बाळासाहेब पवार, वीरपत्नी इंद्रायणी भालसिंग,वीरपत्नी सारीका भाकरे, वीरपत्नी फरजाना फिरोज शेख,वीरपत्नी अंबिका भोंदे,रेखा खैरनार,सोनाली लोखंडे, जया पालवे,रेश्मा पवणे, पुष्पाताई राऊत,सविता मोरे,रेणुका वराडे, डॉ.विद्या प्रकाश त्रिंबके, सीमा त्रिंबके,इंडो आयरिस हॉस्पिटलचे डॉ.वसुंधा जोंधळे, डॉ.प्राची जोंधळे,राकेश जोंधळे,योगेश पिंपळे, अंजली आव्हाड,नांगरे, मीरा काळे,देविदास गुडा,पोकळे यांसह सर्व माजी सैनिक पत्नी आणि परिसरातील ग्रामस्थ महिला साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.