अहिल्यानगर (दि.२ फेब्रुवारी):-स्व.बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी वाडीया पार्क येथे ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र कुस्ती संघाचे राज्य उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या स्पर्धेत गादी विभागाच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ हा विजयी झाला आहे.
पृथ्वीराज मोहोळ ६७ वा महाराष्ट्र केसरी बनला आहे पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना चांगलाच रंगला होता. यावेळी पहिल्या फेरीपासूनच पृथ्वीराज मोहोळ हा आघाडीवर होता.पृथ्वीराज मोहोळला कुस्ती दरम्यान दुसरा गुण चुकीचा दिला गेल्याने पराभूत पैलवान महेंद्र गायकवाड यांनी मैदान सोडले व पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केले.