पूर्णा प्रतिनिधी:-पूर्णा येथील बौद्ध विहारात २२ वी धम्म परिषद नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळी शाहीर संभाजी गायगोधने यांची कन्या सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असणाऱ्या सुकेशिनी गायगोधने यांनी दक्षिण कोरियातील भिक्खु संघाला सुंदर असा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा भेट म्हणून दिला.
या धम्म परिषदेस भारतासह परदेशातील प्रसिद्ध भन्तेजी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गोदावरी नदीपात्रातील बेटावर दक्षिण कोरियाचे भंते धम्मदाना,भंते आनंदमित,भंते उपगुप्त महास्थवीर,या भिक्खु संघाच्या उपस्थितीत उपसंपदा विधीही पार पडला.आंबेडकरी चळवळीतील नगरसेवक उत्तम खंदारे यांच्या घरी भिक्खु संघाला भोजनदान देण्यात आले.यावेळी धम्म परिषदेत उपासक व उपासीकांना अभिवादन त्रिसरण पंचशील करून धम्म देसना देण्यात आली.यावेळी परिसरातील अनेक जणांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
धम्म परिषदेची सांगता राष्ट्रगीताने झाली.यावेळी भंते पाय्यावंश, प्रकाश कांबळे,त्र्यंबक कांबळे, राम भालेराव,अमृत कऱ्हाळे, अतुल गवळी,साहेबराव सोनवणे,विजय बगाटे,प्रशांत भालेराव,श्रीकांत हिवाळे,दिलीप गायकवाड,पीजी.रणधीर, दादाराव पंडित,हर्षवर्धन गायकवाड,धम्मा जोंधळे, भारतीय बौद्ध महासभा,निवृत्त रेल्वे कर्मचारी,महिला मंडळ व परिसरातील उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.