अहील्यानगर (दि.४ प्रतिनिधी):-शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथील कामगाराला दिसल्याने त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या अनोळखी पुरुषाच्या ओळख पटविण्याचे काम तोफखाना पोलिसांच्या टीम कडून सुरू आहे.तरी तोफखाना पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की,सदरील मयत इसमा बाबतीत कुणाला काही माहिती असल्यास संपर्क साधावा पोहेकॉ/जे.एन.आव्हाड मोनं/९५१८५१४९९२, तोफखाना पोलीस स्टेशन ०२४१-२४१११८