अहिल्यानगर (दि.17 प्रतिनिधी):- शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात दोन रिक्षा चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला.
ही घटना सोमवारी (दि.१७) फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.या घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले.याबाबत घटनेची माहिती कळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले व तेथील वाहतूक सुरळीत केली.
मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक मुद्दसर शेख व वसंत मोकाटे यांच्यात वाद झाला.मात्र यां वादाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. बस स्थानक परिसरात या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पुढील तपास पोलीस करीत आहे.