अहिल्यानगर (दि.17 फेब्रुवारी):- जिल्हा शासकीय रुग्णालय येथे राज्याच्या कुटुंब कल्याण उपसंचालक डॉ.रेखा गायकवाड यांनी भेट दिली.

या भेटी दरम्यान गायकवाड यांनी प्रथम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे,अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डावरे, यांच्या समवेत जिल्हांतर्गत सर्व कार्यक्रमाचे विभाग प्रमुख व समन्वयक यांच्याशी आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी RCH कार्यक्रमांतर्गत गरोदर माता नोंदणी पासून प्रसूती सेवा, प्रसूती पश्चात सेवा, जननी सुरक्षा योजना यांचा आढावा घेतला. तसेच याची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. तसेच जिल्हा व तालुकास्तरावर बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याची माहिती व मेळावा आयोजन करण्याचे मार्गदर्शन केले.आढावा बैठकीनंतर सौ. गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालयामधील अपघात विभाग,बाह्यरुग्ण विभाग, अति दक्षता विभाग, नवजात अर्भक अतिदक्षता विभागातील रुग्णांची संवाद साधून रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी,जिल्हा समन्वयक व टीमचे विशेष कौतुक केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूराव नागरगोजे, प्रशासकीय अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक साहेबराव डवरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बलांडे,पॅथॉलॉजिस्ट डॉ. महामुनी,आधीसेविका श्रीमती.ज्योती लोंढे, परिसरेविका सुरेखा आंधळे, परिचारक श्री.काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय गायकवाड,आशा समन्वयक प्रज्योत उपाध्ये,मुख्य औषध निर्माण अधिकारी श्री.काझी, हिमेट्रलॉजी विभागाचे जिल्हा समन्वयक श्री.आशिष इरमल,लेखापाल श्री.संजय पालवे,विजय दळवी,श्रीमती. लंके,श्रीमती.कालिंदा नागरगोजे,सांख्यिकी आणवेशक श्रीमती.गायकवाड यांच्यासह विविध विभातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.