अहिल्यानगर (दि.१७ प्रतिनिधी):- नगर शहरातील उड्डाणपुलाच्या खालील पिलरवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्रावर अज्ञात इसमाने भित्तीपत्रक चिकटवले आहे.
याबाबत महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी राकेश बाळकृष्ण कोतकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आर्य करिअर अकॅडमी पोलीस भरती स्पेशल बॅच संगमनेर या संस्थे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिलरच्या दोन्ही बाजूला जाहिरातीचे पोस्टर लावुन शहर विद्रुपीकरण केलेले आढळून आले होते.
सुनिल खंडेराव कंटगरे यांच्या संस्थेचे हे पोस्टर लावलेले असल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपीकरण प्रतिबंद अधि. 1995 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.