अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाथर्डी व नेवासा येथील महिलांना चाकुचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींना जेरबंद करून 3 लाख 50,500/- रू.किंमतीचे मुद्देमालासह 5 गुन्हयांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.17/02/2025 रोजी फिर्यादी श्री.संतोष भगवान खेडकर (वय 42,रा.मालेवाडी, ता.पाथर्डी) यांचे राहते घरी त्यांच्या आजी घरामध्ये बसलेल्या असताना अज्ञातांनी घरात येऊन,धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादीचे आजीच्या नाकातील सोन्याची नथ ओरबडून चोरून नेली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 139/2025 बीएनएस कलम 309 (4), 3 (5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाला कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या.पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा सचिन ईश्वर भोसले, रा.बेलगाव,ता.कर्जत याने त्याचे भावासह केला असून ते त्यांचे राहते घरी बेलगाव,ता.कर्जत येथे येणार आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून बेलगाव,ता.कर्जत येथे आरोपीतांचा त्यांचे राहते घरी शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीतांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1)सचिन ईश्वर भोसले, वय 25, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर 2) विधीसंघर्षित बालक, वय 17, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याने पंचासमक्ष एकुण 3,50,500/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात सोन्याचे दागीने वेगवेगळे दागीने व एक चाकु असा मुद्देमाल काढुन दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे. पथकाने सचिन ईश्वर भोसले यास विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने पाथर्डी तालुक्यात सांगवी, करोडी व मालेवाडी,ता.पाथर्डी येथे वर नमूद विधीसंघर्षित बालकासोबत गुन्हा केल्याची माहिती सांगीतली आहे.सचिन ईश्वर भोसले याचेकडे आणखी कोठे गुन्हे आहेत काय याबाबत विचारपूस केली असता त्याने 3) पैऱ्या उर्फ पैरेदार उमरका भोसले (फरार) 3) गाडया उर्फ गाडेकर झारक्या चव्हाण (फरार) दोन्ही रा.नवी नागझरी, ता.गेवराई, जि.बीड अशांनी मिळून सौंदाळा, हांडीनिमगाव, ता.नेवासा येथे टीव्हीएस रायडर मोटार सायकलवर जाऊन चोरी केली असलेबाबतची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याने त्याचे साथीदारासह नेवासा व पाथर्डी येथे केलेल्या गुन्हयांच्या सांगीतलेल्या माहितीवरून पाथर्डी व नेवासा पोलीस स्टेशनचे खालीलप्रमाणे 05 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनं 139/2025 बीएनएस 309 (4), 3 (5) या गुन्हयाचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश माळी,गणेश धोत्रे,शाहीद शेख, रविंद्र घुंगासे,भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर,अमोल कोतकर,भगवान थोरात,किशोर शिरसाठ,फुरकान शेख,मेघराज कोल्हे,महादेव भांड व चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.
