संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट,हिवरगाव पावसा येथे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात होते.राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी तसेच आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांचा समृध्द कलेचा वारसा असलेल्या हिवरगाव पावसा कला नागरीत सांस्कृतिक श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट वतीने कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते.
सदर यात्रा उत्सवा निमित्त तमशा क्षेत्रात प्रथम प्रदार्पण करणा-या आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कला सम्राज्ञी पवळा कला मंच व महात्मा फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहु विचार मंचाच्या वतीने लोक कलावंतांना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.यावर्षी प्रसिद्ध लोककलावंत आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर लावणी सम्राज्ञी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राज्य सांस्कृतीक पुरस्कार विजेते कैलास नारायणगावकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच अमर पुणेकर,भाग्यश्री गायकवाड व इतर कलावंतांना कलावंत पुरस्काराने गौरविण्यात आले.
खंडोबा यात्रा उत्सवा निमित्त प्रसिद्ध लोककलावंत आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नटरंगी नार या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी लोककला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदाना बद्दल सुरेखा पुणेकर यांना आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर लावणी सम्राज्ञी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर दुसऱ्या दिवशी कै.विठाबाई नारायणगावकर यांच्या सुप्रसिद्ध तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हजेरीच्या कार्यक्रमा दरम्यान कला सम्राज्ञी पवळा कला मंचाच्या वतीने तमाशा कलावंत कैलास नारायणगावकर यांना संस्थेचे अध्यक्ष तथा आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कैलास नारायणगावकर( सावंत) यांनी सन १९८२ मध्ये तमाशा क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी महाराष्ट्रातील जत्रा,यात्रा, उत्सवानिमित्त विनोदी भूमिकेतून रसिकांच्या मनावर चाळीस वर्षे अधिराज्य गाजवले आहे.रक्तात न्हाली कु-हाड,मुंबईची केळीवली,ऐतिहासिक वगनाट्य रायगडची राणी,शेवटी मला जीव लावा त्यांची यासारखी अनेक पौराणिक ऐतिहासिक व सामाजिक,धार्मिक आणि आध्यात्मिक विषयावरील वगनाट्ये महाराष्ट्रभर गाजली आहे.तमाशा क्षेत्रात लोककला जिवंत ठेवण्याचे कार्य कैलास नारायणगावकर यांनी केले आहे.त्यामुळे यांच्या तमाशा क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगांवकर त्यांच्या स्मरणार्थ जन्मगावी कला सम्राज्ञी पवळा कलामंच व महात्मा फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहु विचार मंचाच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट पुरस्काराने गौरविण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव,सरपंच सुभाष गडाख,उद्योजिका नंदा विलास पवार,संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव,उपाध्यक्षा रंजना भालेराव,जेष्ठ संपादक यादवराव पावसे,पोलिस पाटील मथाजी पावसे,शिवसेना(शिंदे) जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,देवगड खंडोबा ट्रस्टचे विश्वस्त उत्तम जाधव,देवगड देवस्थानचे अध्यक्ष तथा वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे,बाळासाहेब गडाख,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,बाळासाहेब भालेराव,बाबासाहेब कदम,राजू दारोळे,अभिजित भालेराव,मायाताई बागुल,रोहिणी भालेराव,विकास दारोळे व ग्रामस्थांसह मोठ्या प्रमाणात कलाप्रेमी नागरीक उपस्थित होते.
