पारनेर (प्रतिनिधी):- वायफट खर्चाला फाटा देत सामाजिक कार्यकर्त्या तथा अखंड मैत्री 1992 मैत्री ग्रूप संस्थापिका,राष्ट्रीय निरीक्षक महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली जयश्री घावटे/ठुबे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कोणताही मोठेपणा न करता पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार ग्रामपंचायत मोफत फिनिक्स अन्नछत्रालया मार्फत वयस्कर आजी -बाबांना घरपोच टिफिनची सेवा आहे.परंतु आपणही समाजाचे काहीतरी देण लागतो म्हणून सौ.ठुबे यांनी त्या वयोवृद्धांना सहा हजार रुपयांचा किराणा भेट म्हणून दिला.
तसेच त्याच दिवशी त्यांचे बाबा लमा ठुबे गुरुजी यांची पुण्यतिथी असते. दोन्हीही कार्यक्रमाला वायफट खर्च न करता गोरगरिबांना अन्नदान मिळेल या भावनेतून जयश्री घावटे/ठुबे यांनी हा उपक्रम राबविला.एकल महिला,पीडित तरुणी यांच्यासाठी वेळेची तमा न बाळगता सौं.घावटे यांनी त्यांना न्याय देण्यासाठी खूप अहोरात्र कष्ट घेतले आहे. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविला आहे व वर्षभर असे कार्यक्रम राबवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सौ.जयश्री घावटे/ठुबे यांनी सांगितले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाने पारनेर तालुक्याची मान अधिक उंचावली आहे.