अहिल्यानगर (प्रतिनिधी):- एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत निंबळक येथे दि.2 मार्च रोजी संदीप कोंडीबा कोतकर यांच्या गणेश किराणा स्टोअर येथे आरोपींनी हातात तलवार दांडके लोखंडे रॉड घेऊन कोतकर कुटुंबीयांना गंभीर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जखमी केले होते.याबाबत संदीप कोतकर यांचे बंधू राजेंद्र पोपट कोतकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती फिर्यादीनुसार आरोपींवर आर्म ॲक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याबाबत एमआयडीसी पोलिसांवर विविध आरोपही झाले होते व ग्रामस्थांनी निंबळक गाव ही एक दिवस बंद ठेवले होते.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आरोपींच्या शोधासाठी पोलीस स्टेशन मधील पोलिसांचे चार पथक तयार केले.यावेळी पथक शोध घेत असताना या गुन्ह्यातील आरोपी नागापूर सावेडी बोल्हेगाव येथून जेरबंद करण्यात आले.संतोष रघुनाथ धोत्रे,अजय सोमनाथ गुळवे,अमोल गोरख आव्हाड,विशाल भाऊसाहेब पाटोळे,सुधीर प्रदीप दळवी,राहुल नाथा गोरे,तुषार लहानू पानसरे, अक्षय बाळासाहेब ठुबे,यश सुनील सरोदे,सुरज अरविंद भिंगारदिवे,करण गौतम अवताडे, शरद जगन पाटोळे, असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदरील आरोपींवर तोफखाना,एमआयडीसी व कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव,पोलीस उपनिरीक्षक देविदास भालेराव,पोलीस अंमलदार उगलमुगले,साबीर शेख,राजू सुद्रिक,नंदकिशोर सांगळे,पोहेकॉ.चौधरी,टेमकर,कावरे,संदीप चव्हाण,पितळे,मस्के,थोरात,नेहूल,मुकुंद दुधाळ,महेश बोरुडे,पालवे,आढाव,किशोर जाधव,नवनाथ देशमुख,दहिफळे,सुरज देशमुख, राठोड,शिंदे,धुमाळ,सानप,मोरे,उमेश शेरकर,वंजारी व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू,नितीन शिंदे यांनी केली आहे.