अहिल्यानगर (प्रतिनिधी):-35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सन 2024 2025 ही ठाणे शहरात दि.21 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.अहिल्यानगर जिल्ह्यातील 28 पोलिस खेळाडू यांनी नाशिक परिक्षेत्र तर्फे सहभाग नोंदवला असून एकूण 8 पोलिस खेळाडू यांनी उत्कृष्ट कामगिरी करून 3 सुवर्ण 1 रोप्य आणि 4 कांस्यपदक मिळवून अहिल्यानगर पोलीस दलाचे नाव उंचावले आहे.यामधील 1)बास्केटबॉल या खेळ प्रकारात कपिल श्रीराम गायकवाड 2)धीरज अभंग यांनी कोल्हापूर परिक्षेत्र यांना अंतिम सामन्यात पराभूत करून सुवर्णपदक पटकाविले.
3)उशू खेळ प्रकारात मनीषा निमोणकर यांनी सुवर्णपदक प्राप्त केले
4)बॉक्सिंग या खेळ प्रकारात कोमल शिंदे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले व तायक्वांदो या खेळ प्रकारात रोपे पदक मिळविले 5)जुडो या खेळ प्रकारात शेखर वाघ यांनी कांस्यपदक पटकावले 6)बॉक्सिंग या खेळता प्रकारात आशा वाघ यांनी कांस्यपदक पटकाविले
7)कुस्ती या खेळ प्रकारात ज्योती झुघे यांनी कांस्यपदक पटकाविले
8)तायक्वांदो या खेळ प्रकारात काजल वीर यांनी कांस्यपदक पटकाविले
तसेच 18 वी महाराष्ट्र राज्य पोलीस शूटिंग स्पोर्ट्स स्पर्धा बालेवाडी पुणे स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तल प्रकारात पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यानी कांस्यपदक पटकाविले.वरील सर्व पोलीस खेळाडू अंमलदारांचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी,पोलीस उपनिरीक्षक विक्टर जोसेफ आदि उपस्थित होते.