संगमनेर तालुका प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):- संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावचे सुपुत्र कै.नवनाथ विठ्ठल बर्डे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले ते मुंबई पोलीस दलात कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आई वडील व बहिणी आहेत.त्यांच्या मूळ गावी चिंचोली गुरवमध्ये पोलिस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देवून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गावातील व तसेच संगमनेर तालुक्यातून जनसागर लोटला होता.यावेळी संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.कुटुंबीय ग्रामस्थांनी त्यांना कै.नवनाथ बर्डे यांना साश्रूनयनांनी भावपूर्ण निरोप दिला.