अहमदनगर प्रतिनिधी (दि.२८ जानेवारी):-महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 2,60,000/- (दोन लाख साठ हजार) रुपये किंमतीची विना चारापाणी ताब्यात ठेवुन कत्तलीसाठी वाहतुक करणारी पाच (05) जिवंत जनावरे नेवासा येथुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह जप्त केली आहे. घटनेतील माहिती अशी की श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/मनोहर शेजवळ,पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,संदीप घोडके, लपोना/शंकर चौधरी,पोना/ज्ञानेश्वर शिंदे,संदीप दरदंले, पोकॉ/मच्छिंद्र बर्डे व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशांना बोलावुन कळविले की,आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सलाबतपुर ते खडकाफाटा रोडने एक पांढरे रंगाचे टेम्पोमधुन गोवंश जनावरांची वाहतुक करुन कत्तलीसाठी घेवुन जात आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.अनिल कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नेवासा पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे मदतीने दोन पंचाना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी सलाबतपुर ते खडकाफाटा रोडवर खडका फाटा येथे सापळा लावुन थांबलेले असतांना थोडा वेळात एक पांढरे रंगाचा टेम्पो येताना दिसला टेम्पो चालक व त्याचे साथीदारास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने टेम्पो थांबवला टेम्पोमधील दोन्ही इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) फिरोज अन्सार देशमुख वय 34,रा.इस्लामपुर मज्जिद,जुने कोर्ट,ता.नेवासा, 2) शोएब अलिम खाटीक वय 20, रा.खाटीकगल्ली,ता. नेवासा असे सांगितले.सदर टेम्पोची पाहणी करता त्यामध्ये तीन मोठ्या जिवंत गाई व दोन लहान वासरे मिळुन आली.ताब्यातील दोन्ही इसमांकडे टेम्पो व गोवंश जनावरे या बाबत विचारपुस करता ते समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागले.त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकानईने चौकशी करता त्यांनी सदर टेम्पो व गोवंशी जनावरे ही 3) नदीम सत्तार चौधरी,रा.खाटीकगल्ली, ता. नेवासा याचे मालकिची असुन त्याचे सांगणेवरुन विक्री करण्यासाठी घेवुन चाललो असल्याची कबुली दिली.ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात पाच (05) लहान मोठी जिवंत जनावरे व वाहतुकीसाठी वापरलेला एक टेम्पो असा एकुण 2,60,000/- रु. (दोन लाख साठ हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.सदर बाबत पोना/185 ज्ञानेश्वर नामदेव शिंदे,ने.स्थागुशा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन नेवासा पोलीस स्टेशन 72/2023 महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम 5 (अ) 9 सह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर,श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग,अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
