अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.171/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(2), 115(2), 351(2), 352.3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील आरोपी किशोर जयसिंह पठारे (रा.पिंपळगाव माळवी,ता.जिल्हा- अहिल्यानगर,हल्ली रा.वडगाव गुप्ता,ता.जिल्हा अहिल्यानगर) व इतर 3 आरोपी हे कायम चकवा देत मिळुन येत नसल्याने कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्यातील पाहीजे आरोपी यांचा शोध घेणेबाबत आदेशीत केले होते.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे आदेशाने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे उपरोक्त नमुद गुन्ह्यातील आरोपी पाहीजे यांचा शोध घेत असताना दि.11 मार्च रोजी गुन्ह्यातील आरोपी अ.नं.1) किशोर जयसिंह पठारे हा मिळून आला.त्यास पोलीस निरीक्षक यांचे समक्ष हजर केले.सदर आरोपी हा रेकॉर्डवरील दुचाकी चोर असल्याचे लक्षात आल्याने त्याचे कडे त्याचे विरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्याबरोबरच पोलीस स्टेशन हद्दीत होत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचे तपासाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने अहिल्यानगर शहर तसेच आजुबाजुच्या परिसरातुन चोरी केलेल्या दुचाकी ह्या त्याचे घराचे जवळ लपवुन ठेवलेल्या असल्याची माहीती दिली.गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांचेसोबत गुन्ह्याचे तपास अधिकारी म.पो.ना.निता अडसरे यांनी नमुद आरोपीचे रहाते घरी पंचासह जावुन चोरीच्या दुचाकी गाड्यांचा शोध घेतल्या असता नमुद आरोपी किशोर जयसिंह पठारे याचे त्याचे रहाते घराचे जवळ लावलेल्या असलेल्या एकुन 5 चोरीच्या दुचाकी गाड्या ह्या तपास अधिकारी यांचेकडे हजर केल्या.
आरोपी नामे किशोर जयसिंह पठारे याने चोरी केलेल्या 3,70,000/- रु.किं. च्या एकुन 5 दुचाकी मोटार सायकली मिळुन आलेल्या आहेत. जप्त दुचाकीपैकी अ.नं. 2, 4 ह्या दुचाकी चोरीबाबत अनुक्रमे तोफखाना,नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असुन इतर चोरीच्या दुचाकीची माहीती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.योगिता कोकाटे,पो.हे.कॉ.विशाल दळवी, संदिप पितळे,म.पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले,म.पो.ना.निता अडसरे,पो.कॉ.दिपक रोहोकले, तानाजी पवार,सुरज कदम, सचिन लोळगे,दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे,संकेत धिवर व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ.राहुल गुंडु यांनी केली आहे.
