अहिल्यानगर (प्रतिनिधी):- लग्न सोहळ्यात चोरीस गेलेले तब्बल 45 लाखांचे 579 ग्रॅम (57 तोळे 9 ग्रॅम) 44 लाख दोन हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने माहिलेने लंपास केले होते.तोफखाना पोलिसांनी तपास करत सोने हस्तगत करून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराला अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की,उदय हाउसिंग सोसायटी रेनाविकर शाळेच्या मागे राहणारे निखिल बबन वाकळे यांनी पत्नीकडे ठेवण्याकरता दिलेले सोन्याचे व चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कपाटातून काढून चोरी करून घेऊन गेले याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.पोलीस गुन्ह्याचा तपास करत असताना यातील फिर्यादी यांच्या भावाच्या लग्नात आलेल्या महिलेने सदरचे दागिने चोरल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले तोफखाना पोलिसांनी अतिशय सीताफिने तांत्रिक पुराव्याच्या आधाराने तपास करून सदर सोने चांदी चोरलेल्या महिलेला विश्वासात घेऊन तिला विचारले असता तिने घराच्या बाजूला असलेल्या पडलेल्या जागेत खड्डे करून पुरून लपवून ठेवलेले होते.त्यापैकी 579 सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले असून सोडलेल्या सोन्यापैकी काही सोन्याचे दागिने सोनाराचा विकल्याचे सांगितले सदर चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारास अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वल राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे सुनील चव्हाण वसीम पठाण बाळासाहेब भापसे संतोष भवर सतीश त्रिभुवन सुजय हिवाळे यांनी केली आहे.