अहिल्यानगर (प्रतिनिधी):- पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील सौ.सिंधुबाई रामराव पाठक यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात खबर दिली की,दि.10 मार्च रोजी पहाटे 05.30 वा.सुमारास त्यांचे शेतातील संत्र्याच्या बागेमध्ये मुलगा सोमनाथ रामराव पाठक हा मयत अवस्थेत मिळून आला आहे.याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला अ.मृ.र.नं. 43/2025 प्रमाणे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता.
अकस्मात मृत्यूचे तपासात अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून मयत सोमनाथ रामराव पाठक (वय 32, रा.सातवड,ता.पाथर्डी) याचे शरीराच्या विविध भागावर मारहाण करून जीवे ठार मारले.याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुरनं 226/2025 बीएनएस 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक यांना ना उघड खुनाच्या गुन्हयाची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना वर नमूद गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोनि/आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.दि.11 मार्च रोजी पथक पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तांत्रीक विश्लेषण व साक्षीदराकडे केलेल्या चौकशीतील विसंगतीवरून गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा अशोक पाठक याने केल्याचे निष्पन्न झाले.पथकाने निष्पन्न आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)डॉ.अशोक रामराव पाठक,वय 39,रा.सातवड, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर हल्ली रा.साईविरा बिल्डींग, नवनाथनगर,ता.राहाता, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याचा मयत भाऊ सोमनाथ रामराव पाठक यास दारू पिण्याची सवय होती.तो सतत दारू पिऊन आई व त्याचे स्वत:चे मुलास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता.तसेच स्वत:चे मुलास जीवे मारून विहीरीत टाकण्याची धमकी देत होता.
ताब्यातील आरोपी हा त्याचा मयत भाऊ यास समजावून सांगण्यासाठी सातवड ता.पाथर्डी येथे आला.त्यावेळी मयत हा दारू पिलेला होता आरोपी हा मयतास समजावून सांगत असताना त्याने पुन्हा त्याची आई व स्वत:चे मुलास मारण्याची धमकी दिली.त्यावेळी आरोपी याने लाकडी दांडक्याने मयताचे डोक्यावर,पाठीवर,छातीवर व पायावर मारहाण केली.त्यावेळी मयत हा त्याचे संत्र्याचे शेतात पळाला त्यावेळी आरोपी हा त्यामागे जाऊन त्याने मयतास मारहाण करून त्याचे हात एका संत्र्याचे झाडाला बांधले. त्यावेळी मयताची हालचाल थांबल्याने आरोपीने त्याला सोडले.त्यानंतर आरोपी हा कोणाला काहीएक न माहिती न सांगता तेथून निघुन गेला असल्याची माहिती सांगीतली.त्यानंतर मयताची आई सौ.सिंधुबाई रामराव पाठक या शेतातील मोटार चालु करण्यासाठी गेला असता त्यांना त्यांचे शेतातील संत्र्याच्या बागेमध्ये मुलगा सोमनाथ रामराव पाठक हा मयत अवस्थेत मिळून आला अशी खबर पाथर्डी पोलीसांना दिली.ताब्यातील आरोपीस गुन्हयाचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार सुरेश माळी,ज्ञानेश्वर शिंदे,संदीप दरंदले,विजय ठोंबरे, अरूण गांगुर्डे,किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर,फुरकान शेख,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.
