छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-अरविंद एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शिवाजी नगर येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये विविध पदावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रणरागिनींना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास महिलांनासमोर मांडला.महिलांनी दैनंदिन जीवनामध्ये स्वतःसाठी कसे जगावे या रणरागिनी कडून शिकायला पाहिजे असे प्रतिपादन अरविंद फाउंडेशनच्या संचालिका नेहा धाडवे/ढोके यांनी केले.
सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यां म्हणून डॉ.मनीषा भोंडवे शहर क्षयरोग अधिकारी,तिलोत्तमा मापरी मुख्य.मनपा स्कूल, अर्पिता शरद मीडिया विश्लेषक स्मार्ट सिटी,पूजा घुगे डेप्युटी इंजिनियर मनपा छ.सं. नगर,किरण आडे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्मार्ट सिटी, लता जाधव दामिनी पथक, कविता सप्रे पिडीलाईट,मंगला जोशी रिटायर्ड मनपा शिवणकाम शिक्षिका या कार्यक्रमास उपस्थित होत्या.तसेच अरविंद फाउंडेशन च्या संचालिका नेहा धाडवे (ढोके),उन्नती महिला मंच सचिव सुशीला शहाणे,मंजुषा वयकोस,सारिका खके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.