अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत 6 गावठी हातभट्टीच्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत 1 लाख 25,000 रुपये किमतीचे 2500 लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तसेच 14,000 रुपये किमतीची 140 लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू नष्ट करण्यात आली.
सोमनाथ नारायण पवार रा.साकत,श्रीरंग पांडुरंग गव्हाणे रा.वाळुंज,गणेश टिल्लू पवार रा.नेप्ती,कानिफनाथ भिमाजी कळमकर रा.नेप्ती तसेच दोन महिला आरोपीतांवर कारवाई करण्यात आली आहे.सदरची कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते,पोसई.धुमाळ,सहायक फौजदार गांगर्डे,पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनटक्के,दाते,खरमाळे,पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग,संभाजी बोराडे यांनी केली आहे.