अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्हा रुग्णालय, संपूर्ण सुरक्षा केंद्र, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व जय अंबिका तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १० मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ या वेळेत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण व डॉ.बापूसाहेब नागरगोजे , जिल्हा आरोग्य अधिकारी , यांच्या हस्ते डॉ.सतीश राजुरकर , आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा,डॉ.अविनाश आहेर,जिल्हा क्षयरोग अधिकारी,डॉ.विनोद काकडे तालुका आरोग्य अधिकारी,श्री.शिवाजी जाधव जिल्हा कार्यक्रम आधिकारी,श्री. राम पानमळकर सरपंच नागरदेवळे ग्रामपंचायत,डॉ. शिवशंकर वलांडे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बाह्य संपर्क जिल्हा रुग्णालय,श्री. प्रवीण मुत्याल स्नेहालय प्रकल्प संचालक,श्री.नंदकुमार भंडारी, जय अंबिका तरुण मंडळ,श्री. सुनील गुरव तुळजाभवानी मंदिर भिंगार,श्री.राहुल पानसरे सदस्य पंचायत समिती,श्री.रोहित भुजबळ उद्योजक तथा सदस्य ग्रामपंचायत नागरदेवळे,श्री. महेश झोडगे युवा उद्योजक भिंगार,श्री.पराग खुपसे उन्नती सेवाभावी संस्था भिंगार,नंदू अहिरे तुळजाभवानी मंदिर भिंगार,मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून व फित कापून करण्यात आले.
गरीब गरजूंनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घेणे त्याचप्रमाणे गंभीर आजार असेल तर जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे उपचार देण्यात येतील असे आव्हान मा. श्री.एन एस चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले. जनतेने महाआरोग्य सेवेचा लाभ घेऊन आपल्या आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य टीम नेहमी सक्रिय असते याचा फायदा नागरिकांनी घ्यावा व आपले आरोग्य उत्तम कसे ठेवता येईल या वर लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले. सदर महाआरोग्य तपासणी शिबिरामध्ये तज्ञ मार्फत विविध तपासणीचे आयोजन देखील करण्यात आले होते.जनरल फिजिशियन,अस्थिरोग तज्ञ,स्त्री रोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, दंत रोग तज्ञ, बालरोग तज्ञ,क्षयरोग तज्ञ, मानसिक आरोग्य तज्ञ , कान घसा तज्ञ, रक्त तपासणी विभाग इत्यादी मार्फत रुग्णांना सेवा देण्यात आल्या, लाभार्थी यांना मोफत तपासणी करून औषधोपचार देण्यात आले. महाआरोग्य तपासणी शिबिर सकाळी १०.३०ते ४.३० वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते सदर आरोग्य शिबिरात ७०० ते ७५० लाभार्थी यांनी सहभाग घेऊन आपली तपासणी करून घेतली.
शिबिरात सहभागी नागरिकांना उन्नती सेवाभावी संस्थेमार्फत अल्पोपहार वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधाकिसन पाटोळे,नवनाथ लोखंडे,प्रवीण देठे,सविता बेल्हेकर,विनय इदे,राहुल दौंडे , अल्पना अल्हाड,विकास वाळुंज , दीपक पंजाबी , रेखा सोनटक्के , रूपाली देशमुख , महा लॅब कर्मचारी, सागर फुलारी संपूर्ण सुरक्षा केंद्र व्यवस्थापक, रोहन भांबळ संपूर्ण सुरक्षा केंद्र अहिल्यानगर, समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.