संगमनेर प्रतिनिधी (दत्तात्रय घोलप):- संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री.महालक्ष्मी माता मंदिर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.मंदिरात सोने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले असून या आरोपीकडून तब्बल 26 लाख 12,900/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि.08 मार्च रोजी रात्री श्री.महालक्ष्मीमाता मंदीर, काकडवाडी, ता.संगमनेर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलुप तोडुन देवीच्या मुर्तीचे चांदीचे टोप,चांदीचे टोपामधील सोन्याचे पान, मुतींचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र व इतर सोन्याचे दागीने 24,94,000/- रुपये किमतीचे दागिने चोरुन नेले आहे.याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.116/2025 बीएनएस 331 (4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्वत: घटना ठिकाणी भेट देऊन मंदीर चोरीचे गुन्हयाचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेवुन लागलीच पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर गुन्हयाचा समांतर तपास करून गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले. नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी घटनाठिकाणी भेट देवुन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपध्दतीची माहिती घेवुन स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि हेमंत थोरात व पोलीस अंमलदार सागर ससाणे,अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ,सुनिल मालणकर,भगवान थोरात, फुरकान शेख,मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांचे पथक तयार करुन आरोपीची माहिती काढणेकामी पथकास आवश्यक सुचना देवुन रवाना केले.
पथकाने गुन्हयाचे तपासात घटनाठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना दि.13 मार्च रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे, रा.हिवरगाव पावसा,ता.संगमनेर याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.पथकाने बातमीदारामार्फत सुयोग अशोक दवंगे याची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलीक याचे मध्यस्थीने गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळे रंगाची फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार एमएच-04-एचएफ-1661 मधुन संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.पथकाने तात्काळ लोणी ते कोल्हार जाणारे रोडवरील सापळा रचुन थांबलेले असताना संशयीत कार मिळून आल्याने तिस थांबवून रोडचे बाजुला घेत असताना कारमधुन तीन इसम पळून जाऊ लागले.पथकातील काही अंमलदारांन त्याचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकुण सहा इसमांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) सुयोग अशोक दवंगे, वय 21, रा.हिवरगाव पावसा, ता.संगमनेर जि.अहिल्यानगर 2) संदीप किसन साबळे, वय 23, रा.पाचपट्टावाडी, ता.अकोले, जि.अहिल्यानगर 3) संदीप निवृत्ती गोडे, वय 23, रा.सोमठाणे, ता.अकोले, जि.अहिल्यानगर 4) अनिकेत अनिल कदम, वय 21, रा.टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे 5) दिपक विलास पाटेकर, वय 24, रा.टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे 6) सचिन दामोदर मंडलीक, वय 29, रा.संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीतांची अंगझडती घेतली असता आरोपीतांचे ताब्यातुन 26,12,900/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 199 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागीने, 1665 ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागीने (पान, मुकूट, मणी, नेकलेस, कंबर पट्टा, चैन, नथी, मुर्ती, पादुका, छत्री, पंचारती इ.), 3 मोबाईल व एक फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार क्रमांक एमएच-04-एचएफ-1661 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपी सुयोग अशोक दवंगे याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने वर नमूद अ.क्र.2 ते 5 याचेसह दि.08/03/2025 रोजी रात्री व दि.09/03/2025 रोजी पहाटे काकडवाडी, ता.संगमनेर येथील महालक्ष्मी मंदीरात चोरी केली.तसेच आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय याबाबत विचारपूस केली असता त्याने दि.06/03/2025 रोजी रात्री कुंदेवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक येथील बालाजी मंदीर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदीरात चोरी केल्याची माहिती सांगीतली.
व चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन दामोदर मंडलीक याचे मध्यस्थीने विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.ताब्यातील आरोपीतांनी नाशिक येथे केलेल्या मंदिर चोरीबाबत पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
