अहिल्यानगर (प्रतिनिधी):- रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन इसमा कडून तोफखाना पोलिसांनी धारदार शस्त्र (कोयता) जप्त करून दोघांना बेड्या ठोकल्या आहे.हि कारवाई दि.14 मार्च रोजी गजराज फॅक्टरी जवळ रात्री एक वाजेच्या सुमारास पोलिसांनी केली आहे.
अनिकेत राजेंद्र वडाळे,साहिल शरद कणगरे असे अटक केलेल्या इसमांची नावे आहेत.पोकॉ/ किरण उकिरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात आर्मी ऍक्ट सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक गांगर्डे हे करीत आहेत.
सदरची कारवाई तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील,पोहेकॉ/सुनील चव्हाण, योगेश चव्हाण,सुधीर खाडे,सुरज वाबळे,सुनील शिरसाट,राहुल शेळके,बाळासाहेब भापसे,सतीश भवर,सुजय हिवाळे,सतीश त्रिभुवन यांनी केली आहे.
