अहिल्यानगर (प्रतिनिधी):- सावेडी नाका येथील शोरूमसह श्रमिकनगर मधून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने भिस्तबाग महाला जवळ सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून 1 लाख 6 हजार रुपयांच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. उमेश दिलीप गायकवाड (रा. सपकाळ चौक) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी एक इसम भिस्तबाग महाला जवळ येणार आहे अशी माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.पथकाने सदरील ठिकाणी छापा टाकून उमेश गायकवाड याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता दोन गुन्हे उघडकीस आले.
सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे,पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट,सुनील चव्हाण,अहमद इनामदार,वसीम पठाण, भानुदास खेडकर,योगेश चव्हाण, सुरज वाबळे,सुधीर खाडे,सुमित गवळी,सतीश त्रिभुवन, बाळासाहेब भापसे,सुजय हिवाळे,सतीश भवर यांनी केली आहे.
