अहिल्यानगर (प्रतिनिधी):- भिंगार कॅम्प हद्दीतील लष्करी परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी बीड जिल्ह्यात जाऊन जेरबंद केले आहे.एमआयआरसी गेट क्रमांक 2 येथील इमारतीचे बांधकाम करण्यासाठी बिल्डिंग मटेरियल रूममध्ये सील करून ठेवलेले असताना दरवाजाचा कडीकोंडा तोडून 16 लाख 3 हजार 651 रु.किमतीचा मुद्देमाल राधा कलगुडे व संतोष खरात यांनी चोरून नेला आहे.
याबाबत सुभेदार नूर इस्लाम अब्दुल वहाब (रा.एमआयआरसी सोलापूर रोड) यांनी फिर्याद दिली होती.आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना पेठ पोलीस ठाणे बीड जिल्हा यांच्या मदतीने संतोष अशोक खरात व राधा सखाराम कोलगुडे यांना ताब्यात घेऊन अटक केली व त्यांच्या ताब्यातून 4 लाख 11 हजारांचे मटेरियल ताब्यात घेतले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती,भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पल्लवी वाघ,बाबासाहेब अकोलकर,रामनाथ डोळे,प्रमोद लहारे,कांतीलाल चव्हाण, कल्पना काशीद यांनी केली आहे.
