अहिल्यानगर (प्रतिनिधी):- पिकअप चोरी,दुचाकी चोरी तसेच रेल्वेच्या कॉपर चोरी प्रकरणातील दोन सराईत आरोपींना पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.त्यांच्याकडून 1 लाख 45 रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.11 नोव्हेंबर 2023 रोजी फिर्यादी कुलदीप किशोर जगताप यांची महिंद्रा पिकअप गाडी चोरीला गेली होती,.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहितीवरून कळाले की सदरील गुन्हा हा महेश सोपान पागिरे व प्रसाद संजू मोरे यांनी केला आहे. या दोघांना गांधीनगर बोल्हेगाव येथून ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,पोलीस अंमलदार राजू सुद्रिक,विशाल थोरात,कावरे,किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.