अकलूज (प्रतिनिधी):-पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकलूज शहर महिला आघाडीच्या निवडी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आल्या.
गुरुवार 13 मार्च 2025 रोजी गणेशनगर येथील संपर्क कार्यालयामध्ये महिला आघाडीच्या माळशिरस तालुका अध्यक्ष स्वातीताई धाइंजे यांनी महिला आघाडीच्या अकलूज शहर उपाध्यक्षपदी सुवर्णा पांचाळ तर संघटकपदी अलका किर्ते यांची निवड जाहीर करून महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते सत्कार करून निवडीचे पत्र दिले यावेळी माळशिरस तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले म्हणाले की माळशिरस तालुक्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडीची ताकद वाढत असून महिला आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी आणखी बऱ्याच महिला तयार आहेत नजीकच्या काळात आणखी महिला पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत नवीन महिला पदाधिकाऱ्यांचे पक्षामध्ये स्वागत करून महिलांना मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी करून महिला आघाडीची ताकद वाढवण्यासाठी करावा.
तसेच महिला आघाडीच्या माळशिरस तालुका अध्यक्षा स्वातीताई धाइंजे म्हणाल्या की,पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सन्मान केला जातो त्यामुळे महिला मोठ्या संख्येने पार्टी मध्ये प्रवेश करत आहे. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका सरचिटणीस दयानंद धाईंजे, तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान,सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे,युवक तालुका संघटक विकी लोंढे,तालुका सचिव सिद्धू डावरे,अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे, कार्याध्यक्ष शहाजी खडतरे, उपाध्यक्ष साजिद बागवान, अशोक कोळी,अभिषेक पवार रवी कोळी,वैभव अंबुरे,सागर कोळी,आदेश थोरात आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.