अहिल्यानगर (प्रतिनिधी):- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. बातमीची हकीकत आशिकी, फिर्यादी वसीम सुलेमान खान (रा. सदर बाजार भिंगार) यांनी दिली होती की त्यांचे नगर पाथर्डी रोडवरील न्यू सिटी पॉइंट नावाचे मेडिकलचे शटर तोडून पैशाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली पेटी व रोख रक्कम कुणीतरी आज्ञा चोरट्याने चोरून नेले आहे.याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडलेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पुण्यातील आरोपी हे दौला वडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथे येणार असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर समजली.सपोनी. मुलगीर यांनी तपास पथकातील अंमलदार यांना खात्री करून कारवाई करण्याचे आदेश केले.पोलीस घटनास्थळी सापळा रचून थांबले असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेली.तांत्रिक विश्लेषणद्वारे तपास करीत असताना संगमनेर बसस्थानक येथे असल्याची माहिती समजल्याने पोलीस बसस्थानक परिसरात सापळा रचून थांबले असता पोलीस आल्याची चाहूल लागताच तें पळून जाण्याच्या तयारीत असताना चौघा आरोपीना जागीच पकडले.व त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व किराणा माल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे,पोलीस अंमलदार दीपक शिंदे,रवी टकले,नंदकुमार पठारे,संदीप घोडके,प्रमोद लहारे,दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू,नितीन शिंदे यांनी केली आहे.