अहिल्यानगर (प्रतिनिधी):- श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील अनोळखी तरूणाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून 1 आरोपीस जेरबंद करून आरोपीने गुन्हयांची कबुली दिली आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.12/03/2024 रोजी दाणेवाडी,ता.श्रीगोंदा येथे विठठल दत्तु मांडगे, रा.दाणेवाडी,ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर यांचे शेतातील विहीरीमध्ये अनोळखी मृत व्यक्तीचे कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून कसल्यातरी हत्याराने मृत व्यक्तीचे मुंडके, दोन्ही हात,उजवा पाय धडावेगळे करून त्यास जीवे ठार मारून, मृतदेह पोत्यात भरून टाकले.
याबाबत पोसई/मारूती केशव कोळपे,नेमणुक बेलवंडी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस स्टेशन गुरनं 81/2025 बीएनएस कलम 103, 238 (अ) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची घटना घडल्यानंतर श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत करून, पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले.सदरची घटना घडल्यानंतर पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी घटनाठिकाणी भेट देऊन,स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, शाहीद शेख,बिरप्पा करमल, अरूण गांगुर्डे,संतोष खैरे,रविंद्र घुंगासे,आकाश काळे,विशाल तनपुरे,सागर ससाणे,प्रमोद जाधव,रोहित मिसाळ,अशोक लिपणे,अमोल कोतकर,मनोज लातुरकर,जालींदर माने, फुरकान शेख,प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे,महादेव भांड अशांचे पथक नेमुन वर नमुद गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने घटना ठिकाणच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन, जिल्हयातील तसेच शिरूर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिसींगची माहिती घेऊन,मृतदेहाचे फोटो व कानातील बाळी तसेच मयताचे यापुर्वीचे फोटो यावरून पथकाने मयताचे नातेवाईक यांचेकडे चौकशी करून अनोळखी मृतदेहाची ओळख पटविली.तपासात अनोळखी मृतदेह हा मयत माऊली सतीष गव्हाणे, वय 19, रा.दानेवाडी, पो.राजापूर, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर याचा असल्याचे निष्पन्न केले. दि.16 मार्च रोजी तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत तपास करत असताना सदरचा गुन्हा हा आरोपी नामे 1)सागर दादाभाऊ गव्हाणे, वय 20, रा.दानेवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली आहे.तसेच सदरचा गुन्हा ताब्यातील आरोपीने केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयांचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर हे करीत आहेत. सदर कारवाई श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.