संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात निवेदन देण्यास गेलेल्या छात्र भारतीच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मारहाण केली.तसेच राज्यभरात वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटना,लोकशाही पद्धतीने न्याय मागत असताना होणारी मुस्कटदाबी,नेत्यांची-मंत्र्यांची बेभान वक्तव्य,समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहे.
तसेच संगमनेर येथील मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ मा.आ.कपिल पाटील,मा.आ.डॉ.सुधीर तांबे,सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे,कम्युनिस्टपार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव डॉ.अजित नवले,वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते,सेवा दलाचे राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ कांदळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर प्रांत कार्यालयावर समविचारी पुरोगामी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी डी.वाय.एस.पी सोनवणे यांना निवेदन देऊन आरोपींवर सक्त कार्यवाही व्हावी यासाठी आग्रह धरला.
निषेध सभेसाठीमा.आ.कपिल पाटील,मा.आ.डॉ.सुधीर तांबे,सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव डॉ.अजित नवले,वंचितच्या राज्य प्रवक्ता प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते,सेवा दलाचे राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ कांदळकर,छात्र भारतीचे राज्याचे अध्यक्ष मा.रोहित ढाले,राजाभाऊ अवसक,ॲड.रंजनाताई गवांदे,सिताराम राऊत,डॉ.सागर भालेराव,दत्ता ढगे,रजत अवसक यांच्या सह छात्रभारती संघटनेचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.