पुणे (प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील आबासाहेब काकडे महाविद्यालय येथे प्रा.दिलीप ठोंबे हे इतिहास विषयाचे अधीव्याख्याता म्हणून सन 1999 पासून कार्यरत आहे. तरीदेखील त्यांना पूर्ण वेळ पदाची मान्यता प्राप्त मिळालेली नाही.दोन महिन्यांवर त्यांची सेवानिवृत्ती आलेली असताना देखील प्रा.ठोंबे यांनी पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून त्यांनी न्याय देण्याची मागणी केली आहे.
प्राध्यापक दिलीप ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्ण वेळ मान्यतेसाठी तिसऱ्यांदा उपोषण करूनही त्याची दखल घेतली जात नाहीये,तसेच शिक्षण मंत्री व उच्च शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी 8 दिवसात या प्रश्नाबाबत कार्यवाही करावी असे आदेश उच्च शिक्षण विभागाला दिले होते.
विभागीय सहसंचालक,उच्चशिक्षण आणि संचालक यांनी दुसऱ्या वेळी उपोषण करते प्राध्यापक दिलीप ठोंबरे यांना इतिहास प्राध्यापक पदाच्या पूर्ण वेतन निश्चितीच्या मान्यतेसाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठविला दोन महिन्यांनी सेवानिवृत्ती असल्याने या प्रस्तावाला मंत्रालयातून तात्काळ मान्यता मिळावी यासाठी प्राध्यापक दिलीप ठोंबे यांनी कुटुंबीयांसह उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयासमोर आता तिसऱ्यांदा उपोषणास बसले आहे.