अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गुंतवणुकदारांस कोटयावधी रूपयाचा गंडा घालणाऱ्या आरोपीस गुजरात येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी अवधुत विनायक केदार, रा.खंडोबानगर,शेवगाव, ता.शेवगाव यांना साईनाथ कल्याण कवडे,रा.कुरूडगाव ता.शेवगाव याने त्याचे ऍ़सिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास सांगुन गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर दरमहा 12% परतावा देण्याचे आमीष दाखविले.
त्यावर फिर्यादी व त्याचे कुटुंबियांतील सदस्यांनी तसेच परिसरातील इतर 5 लोकांनी वेळोवेळी ऍ़सिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीमध्ये 1,61,42,900/-रूपये गुंतविले.आरोपीने गुंतवणुकीच्या रक्कमेचा परतावा न देता तसेच गुंतवणुक केलेली रक्कम न देता आर्थिक फसवणुक करून पळून गेला.याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुरनं 887/2024 बीएनएस कलम 406, 409, 420 सह एमपीआयडी कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना आर्थिक फसवणुकीबाबत दाखल गुन्हयांचे समांतर तपास करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.आरोपी हा गुन्हा दाखल होण्यापुर्वीच फरार झालेला असून,तो सातत्याने राहण्याचे ठिकाण व मोबाईल बदलत असल्याने तपासामध्ये अडचण येत होती.दि.17 मार्च रोजी पथक वर नमूद फसवणुकीच्या गुन्हयाचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे निष्पन्न आरोपीचा शोध घेत असता आरोपी हा सुरत, गुजरात राज्यात असल्याची माहिती मिळाली.पथकाने सुरत, गुजरात येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव साईनाथ कल्याण कवडे, वय 28, रा.कुरूडगाव,ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपी साईनाथ कल्याण कवडे याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने त्याचे मालकीची महिंद्रा कंपनीची कार किशोर शिवाजी जाधव,रा.तिसगाव, ता.पाथर्डी यास दिल्याची माहिती सांगीतली.
पथकाने पंचासमक्ष किशोर शिवाजी जाधव यांनी हजर केलेली 15,00,000/- रू किंमतीची महिंद्रा कार क्रमांक एमएच-16-सीवाय-0222 जप्त करण्यात आलेली आहे.ताब्यातील आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संतोष लोढे, शिवाजी ढाकणे,बाळासाहेब गुंजाळ,फुरकान शेख,प्रशांत राठोड व ज्योती शिंदे यांनी केलेली आहे.